कोरोना व्हायरस अलर्ट : ‘बिधनास्त’ अन् ‘पोटभर’ खा ‘चिकन-मटन’, मात्र ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या चिकन-मटण खाणाऱ्यांमध्ये कोरोना विषाणूची भीती दिसत आहे. भारतात कोरोना विषाणूची काही लोकांना लागण झाल्याच्या वृत्ताने ही भीती अजून वाढली आहे. हॉंगकॉंगमध्ये एका मालकापासून त्याच्या कुत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ज्यातून हे सिद्ध झाले आहे की मानवांमधून हा विषाणू प्राण्यांमध्ये पसरू शकतो. विशेष म्हणजे देशात चिकन आणि बकऱ्याच्या मटणाला अधिक मागणी आहे. परंतु गंगाराम रुग्णालयातील सिनियर फिजिशियन डॉक्टर एम.वाली यांनी मटण आणि कोरोना विषाणूशी संबंधित सर्व गोष्टींना अफवा असल्याचे सांगितले आहे.

यामुळे खाऊ शकता चिकन-मटण – डॉ.वाली
माजी राष्ट्रपती डॉ.शंकर दयाल शर्मा, आर.व्यंकटरमन आणि प्रणव मुखर्जी यांचे देखील फिजिशियन राहिलेले डॉक्टर एम.वाली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हे खरं आहे की कोरोना विषाणू माणसापासून कुत्र्यांमध्ये जाऊ शकतो. पण कुत्र्यापेक्षा इतर प्राण्यांमध्ये हा विषाणू जाण्याची शक्यता तशी कमी आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो आणि तिथेच राहतो. हा विषाणू स्नायूंमध्ये जात नाही. त्यामुळे सहसा आपण चिकन आणि मटणचा जो भाग जेवणात वापरतो, त्याला कोणत्याही भीतीशिवाय खाऊ शकतो.

चुकून देखील खाऊ नये चिकन-मटण पासून बनवलेले हे पदार्थ
डॉक्टर एम.वाली यांनी सांगितले की, लोक मोठ्या प्रमाणात चिकन-मटण पासून बनलेल्या विविध पदार्थाचा वापर खाण्यात करत असतात. परंतु या वातावरणात चिकन-मटण खाताना या गोष्टींची काळजी घ्या की, चुकूनदेखील चिकन टिक्का, मटण टिक्का खाऊ नये. कारण टिक्का हा आगीवर भाजून बनवला जात असतो. अशा परिस्थितीत जर दुर्लक्ष झाले आणि थोडेसे जरी मांस कच्चे राहिले असेल तर त्याचा धोका वाढू असतो. म्हणून चिकन-मटण चांगले शिजवून खावे.