रोज खा केवळ 1 डाळिंब; कॅन्सर, डायबिटीज, फ्ल्यू, रक्ताच्या कमतरतेसारख्या 10 आजारापासून होईल बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डाळिंब एक असे फळ आहे, ज्यामध्ये फ्ल्यूपासून बचाव करण्यापासून गंभीर आजारांशी लढण्यापर्यंत क्षमता आहे. अँटीऑक्सिडेंट भरपूर असलेले डाळिंब वेदना आणि सूजेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांना नष्ट करते. रोज एक डाळिंब खाल्ल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे
1 व्हायरस आणि फ्ल्यूपासून बचाव
डाळिंबाचा रस, बी आणि साल उपयुक्त आहे. तोंडाच्या समस्येवर लाभादायक आहे. डाळिंबाचा रस व्हिटॅमिन सी चा मोठा स्त्रोत आहे हा फ्ल्यूविरूद्ध सुरक्षा प्रदान करतो.

2 उच्च रक्तदाब कमी करतो
उच्च रक्तदाब कमी करतो. या समस्येने पीडित लोकांनी रोज 240 मिलीलीटर रस प्यावा. यामुळे हाडे आणि हृदय निरोगी राहते.

3 पचनशक्ती सुधारते
क्रोहन डिसीजमध्ये भूक कमी होते, वजन कमी होते, पोटात गंभीर सूज येते. पोटात तयार होणार्‍या बॅक्टेरियामुळे हे होते. यावर डाळिंबाचा रस उपयोगी आहे.

4 स्मरणशक्ती मजबूत होते
डाळिंबाच्या सेवनाने स्मरणशक्ती मजबूत होते. कमी वयात सेवन केल्यास आश्चर्यजनक फायदे दिसू शकतात.

5 डायबिटीज नियंत्रणासाठी सहायक
यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. तणाव कमी होतो. कोलेस्ट्रॉल कमी होतात. मात्र डायबिटीज रूग्णांनी याचे जास्त सेवन करू नये.

6 हाडांचे आरोग्य सुधारते
डाळिंबाच्या बीयांचे तेल सांधेदुखीत आराम देते. डाळिंबाचा रस सेवन केल्याने हाडांची शक्ती वाढते.

7 कॅन्सरपासून बचाव
यात फ्लेवोनॉइड्स नावाचे अँटीऑक्सीडेंट असते जे कॅन्सरविरोधी आहे.

8 कॉलेस्ट्रोल कमी करते
डाळिंब खाल्ल्याने शरीरात कॉलेस्ट्रोल तयार होत नाही. बहुतांश प्रकरणात हार्ट अटॅकचे कारण कॉलेस्ट्रोल असते.