‘फ्रेंच फ्राइज’ खाल्ल्या तर काहीच होणार नाही नुकसान, बिनधास्त खा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फ्रेंच फ्राइज हा जंक फूडचा प्रकार आहे. परंतु, अतिशय चवदार असल्याने अनेकांना मोह आवरता येत नाही. छोटे असोत की मोठे सर्वांनाच याची भूरळ पडू शकते. जर तुम्हाला फ्रेंच फ्राइज खाण्याची इच्छा झाली तर जास्तीत जास्त 6 फ्रेंच फ्राइज तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. मात्र, यापेक्षा जास्त प्रमाणात खाणे घातक ठरू शकते. कारण यामध्ये मीठ आणि तेलाचे प्रमाण अधिक असते. हार्वर्ड यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टी. एच. चॅन यांनी फक्त 6 फ्रेंच फ्राइज खाल्ल्यास तुम्ही हेल्दी बनू शकता असा दावा केला आहे. 6 फ्राइज जर सलाडसोबत खाल्या तर हे कॉम्बिनेशन न्यूट्रिशन बॅलन्स करण्यासाठी मदत करते, असेही चॅन यांनी म्हटले आहे.

हे लक्षात ठेवा

1) बटाटा हेल्दी –
बटाटा हेल्दी आहे, मात्र, तो कशाप्रकारे खाताय हे महत्वाचे आहे. एक प्लेट फ्रेंच फ्राइजमध्ये सुमारे 200 कॅलरीज असतात. यातील स्टार्च आणि जास्त मीठ ब्लड प्रेशर आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी घातक ठरते.

2) बेकिंग/एयरफ्राय
फ्रेंच फ्राइज फ्राय करण्यासाठी बेक किंवा एयरफ्राय केल्याने फ्राइजमधील कॅलरीज कमी होतात. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

3) रताळे
फ्रेंच फ्राइज किंवा बटाट्याऐवजी रताळे आरोग्यदायी आहे. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर जास्त असते. तेच कॅलरीजचे प्रमाण बटाट्यापेक्षा कमी असते.