खा. सुजय विखे यांच्याकडून ‘राजशिष्टाचार’ भंग !

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नूतन खासदार सुजय विखे पाटील यांनी काल जिल्हा परिषदेत राजशिष्टाचाराचे भंग केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. त्यांच्या खुर्चीवर खासदारांना बसणे हे राजशिष्टाचाराला धरून नाही. त्यांची ही कृती आता प्रशासनात चांगलाच टीकेचा विषय बनला आहे.

नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी काल दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अ‍ॅन्टी चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची बैठक घेतली. लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेत बैठक घेण्यासाठी विविध सभागृह उपलब्ध असताना तेथे बैठक न घेता खा. डॉ. विखे यांनी अध्यक्षांच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये बैठक घेतली.

तीही थेट अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून घेतल्याने अधिकाऱ्यांसह सभापतींनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी व गडाखप्रणीत शेतकरी क्रांती दलाचे काही सदस्य उपस्थित सदर बैठकीस उपस्थित होते. मात्र त्यांनी याबाबत बैठकीत मौन बाळगले. यापूर्वी सन 2003 मध्ये जिल्हााा परिषद अध्यक्षांच्या खूर्चीवर बसलेल्या लोकप्रतिनिधीला उठवण्यात आले होते.

या बैठकीला अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, गडाखप्रणीत शेतकरी क्रांती दलाचे सुनील गडाख, तसेच इतरही सदस्य उपस्थित होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सुजय विखे यांची ही कृती प्रशासनात आता चांगलाच टीकेचा विषय बनली आहे.

सिने जगत – 

#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

‘या’ ऍपच्या इव्हेंट मध्ये ‘कडक’ अंदाजात दिसून आली ‘ही’ अभिनेत्री..

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……

Loading...
You might also like