औषधं सोडा, ‘या’ 5 पदार्थांचं सेवन करून नियंत्रणात ठेवा ब्लड प्रेशर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कमी आणि उच्च रक्तदाब आरोग्यासाठी चांगला नाही. तो नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे वापरतात. परंतु जीवनशैली जरी योग्य ठेवली तर नियंत्रित होतो. चुकीच्या पद्धतीने अन्न खाल्ल्यानेही समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे 5 पदार्थ नियमित घेतल्यास रक्तदाब नियंत्रित होतो.

बदाम

बदामांमध्ये ओमेगा -3 फॅटी असिडस् आणि पोटॅशियम असते. हे तुमचे हृदय मजबूत ठेवण्यात आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास उपयुक्त आहे. भिजलेले बदाम खाणे चांगले.

पोटॅशियमने समृद्ध केळी

केळ्यात पोटॅशियम असते. ते मूत्रमार्फत जादा सोडियम बाहेर काढण्यासाठी व्हॅसोडिलेटर म्हणून कार्य करते.

पौष्टिक पालक

पालक खाणे तितकासा चविष्ट नसेल, तरीही ते पोटॅशियमयुक्त आहार आहे. पालकात फोलेट आणि मॅग्नेशियम आहे. आपण याचा वापर गोड कोशिंबीर, सूप, भाजी म्हणून करू शकता.

कमी चरबीयुक्त दही

आठवड्यातून दोनदा कमी चरबीयुक्त दही सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

बीट बीटरुटमध्ये पोषक द्रव्ये

बीटच्या 100 ग्रॅममध्ये सुमारे 325 मिलीग्राम पोटॅशियम असते. तसेच, हे फायबर, फोलेट (व्हिटॅमिन बी 9), मॅंगनीज, लोह आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. दररोज एक ग्लास बीटचा रस पिणे रक्तदाब रुग्णांना फायदेशीर ठरते.