दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या विकासासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचेशी खा. डॉ भारती पवारांची सकारात्मक चर्चा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  खा. डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेतली. या भेटीप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेत केंद्राद्वारे होत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आत्मनिर्भर भारत योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या उत्पन्नवाढीच्या उपाययोजना करण्यासाठी ह्या योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक तरतूद केल्याचे सांगितले.केंद्र सरकारने नुकतेच कृषीबिल पारीत केले हे शेतकरी हिताचेच असून या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेतकरी अधिक सक्षम होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदतच मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, डाळिंब, ऊस याबरोबरच भाजीपाला पिकांविषयी चर्चा करत माहिती घेतली .नासिक जिल्हा त्यातल्या त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शेतीमाल उत्पादनासाठी देशातअग्रेसर असून तेथील शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी अजून काय काय उपाययोजना करता येतील याचीही चर्चा ह्या प्रसंगी झाली .

खादी ग्रामोद्योग विभागा च्या विकासासाठी अजून नवीन तरतुदी करून त्यास बळकटी दिली जाईल असेही आश्वासन नितीन गडकरी यांनी खा. डॉ. भारती पवार यांना दिले या प्रसंगी धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे, खा. हेमंत गोडसे यांनीही चर्चेत सहभाग घेतला .याच बरोबर आपल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात असे क्लस्टर्स उभारले जाण्यासाठी नागपुरातील विविध क्लस्टर्स ना भेट देऊन माहिती घेतली