Eatable Vaccine | हे असेल भविष्य…! व्हॅक्सीन-औषधांसाठी डॉक्टर सांगतील तुम्हाला वनस्पतींची नावे!

बर्लिन : वृत्तसंस्था – Eatable Vaccine | आता शास्त्रज्ञ अशी व्हॅक्सीन बनवण्याची प्रक्रिया शोधत आहेत, जी तुम्हाला केवळ खायची आहे. म्हणजे खाण्यालायक व्हॅक्सीन (Eatable Vaccine). हे सुद्धा शक्य आहे की, फळे, भाज्या आणि पिकामध्ये व्हॅक्सीन आणि औषधे असतील, जी एखाद्या विशेष आजारापासून बचाव करतील किंवा बरे करतील.

अशा प्रकारच्या तयारीवर सुरू असलेल्या रिसर्चचा एक रिपोर्ट नुकताच सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, भविष्यात वनस्पती, भाज्या आणि फळांना व्हॅक्सीनेट केले जाईल. कदाचित काही वर्षानंतर कोरोना झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला म्हणू शकतात की, ही भाजी आले टाकून खा, तुमचा कोरोना बरा होईल. या भाजीत जगातील सर्वात चांगली व्हॅक्सीन मिसळलेली आहे.

भविष्यात हे शक्य आहे कारण अशाप्रकारच्या प्रोजेक्टची कल्पना 1986 मध्ये देण्यात आली होती. हा स्टडी करणार्‍या संशोधकांनी सांगितले आहे की, 1986 मध्ये मॉलीक्यूलर फार्मिंग (Molecular Farming) ने कल्पना दिली होती. यानुसार वनस्पतीमध्ये उपचार करण्यालायक प्रोटीन्सची मात्रा वाढवली जाईल.

किंवा आजारापासून वाचवणारी रसायने वनस्पतींच्या विकासासोबत त्यामध्ये विकसित होत राहतील. म्हणजे भविष्यात तुम्हाला डोकेदुखी झाली तर डॉक्टर म्हणतील त्या भाजीवाल्याकडून एक जुडी पालक घ्या…बरे व्हाल. किंवा ते फळ खा…त्याने शरीरातील प्लेटलेट्स वेगाने वाढतील. त्यामध्ये प्लेटलेट्स वाढवण्याचे औषध आहे.

ही काही विचित्र गोष्ट नाही. हे शक्य केले जात आहे. अशाप्रकारच्या वनस्पतींच्या मदतीने काही औषधे विकसित केली गेली आहेत.
2012 मध्ये ऋऊअ ने दुर्मिळ गॉचर डिसीज (Gaucher’s Disease) च्या उपचारासाठी गाजर खाण्यास सांगितले होते.
हे ते गाजर होते ज्यांना मेडिकेट करण्यात आले होते.

याशिवाय तंबाखू, तांदूळ, मका सारख्या अनेक पिकांवर आणि वस्पतींमध्ये अशी प्रोटीन आढळतात,
ज्यांना औषधाने ट्रीट करून त्यांना एक यशस्वी व्हॅक्सीन किंवा औषध बनवले जाऊ शकते.

अलिकडेच वनस्पतीवर विकसित करण्यात आलेल्या फ्लूच्या व्हॅक्सीनने आपली फेज-3 क्लिनिकल ट्रायल पूर्ण केली आहे.
ज्यामध्ये तिने चांगले परिणाम दिले आहेत.
याशिवाय संशोधक HIV, Ebola ची सुद्धा अशी व्हॅक्सीन तयार करण्याचा विचार करत आहेत, ज्याद्वारे पिक, भाज्या आणि फळांद्वारे उपचार करता येऊ शकतो.
शास्त्रज्ञ कोरोनाच्या उपचारासाठी सुद्धा वनस्पतीमध्ये व्हॅक्सीन विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संशोधकांनी सांगितले की, पारंपारिक व्हॅक्सीन बनवण्याच्या पद्धतीपेक्षा वनस्पतीमध्येच व्हॅक्सीन विकसित करणे जास्त अधुनिक, टिकाऊ आणि योग्य माध्यम आहे.
कारण येथे अनेक गोष्टी तुम्हाला नैसर्गिक प्रकारे मिळतील.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की वनस्पतींमध्ये विकसित व्हॅक्सीन तीन आठवड्यातच लोकांपर्यंत पोहचेल.
यावर कोणत्याही जनावराच्या पॅथोजनचा परिणाम होणार नाही.
कारण ही वनस्पती आहे. सोबतच यामुळे पर्यावरणाला सुद्धा फायदा होईल.
ऑक्सीजन वाढेल. यानंतर व्हॅक्सीन डोसच्या पद्धतीने विकसित करण्याची आवश्यकता नाही.

Web Title :- eatable vaccines from plants

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्याच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने, हॉटेल अन् बार रात्री ‘या’ वेळेपर्यंत सुरू राहणार, निर्बंध शिथिल

Pune NCP | खड्ड्यासोबत सेल्फी काढा अन् मिळवा 11,111 रुपयांचे बक्षिस, राष्ट्रवादीची अनोखी स्पर्धा

Aadhaar Card मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय अपडेट होईल अ‍ॅड्रेस, जाणून घ्या नियम