Eating Eggs And Diabetes | रोज अंडे खाल्ल्याने वाढू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका! आजच व्हा अलर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Eating Eggs And Diabetes | संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे, अशी एक जुनी घोषणा आहे, जिचा अर्थ आहे की अंडी (Egg) खाणे आरोग्यासाठी चांगले असते आणि अंड्यामध्ये प्रोटीन (Protein) जास्त असतात. सर्व ऋतूंमध्ये दररोज अंडे खाण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. मात्र, एका संशोधनात असे दिसून आले आहे की दिवसातून एक किंवा अधिक अंडी खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहा (Type 2 Diabetes) चा धोका 60 टक्क्यांनी वाढू शकतो. (Eating Eggs And Diabetes)

 

रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा
संशोधकांचे म्हणणे आहे की चीनच्या हेल्थ अँड न्यूट्रिशन सर्व्हेमध्ये 8,000 हून अधिक सहभागींमध्ये असे आढळून आले की ज्यांनी जास्त अंडी खाल्ली ते शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय होते, त्यांच्या सीरम कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होते आणि त्यांनी जास्त प्रमाणात चरबी आणि अ‍ॅनिमल प्रोटीनचे सेवन केले होते.

 

अंडी खाणार्‍यांनी व्हावे सतर्क
अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंड्यातील पिवळ्या बलक (Egg Yolk) मध्ये आढळणारे कोलीन ऑक्सिडेशन आणि सूजची जोखीम वाढवू शकते, जे अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये आढळणार्‍या रसायनांमधून कार्बोहायड्रेट्सचे (Carbohydrates) शोषण रोखते. जगभरातील अनेक घरांमध्ये अंडी हा नाश्त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. (Eating Eggs And Diabetes)

जास्त अंडी खाल्ल्याने वाढतो मधुमेहाचा धोका
अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, अंड्याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहा (Diabetes) चा धोका वाढतो. एका अंड्यामध्ये सुमारे 200 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल (Cholesterol) असते, त्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी नुकसानकारक ठरू शकते.

 

अंडी खाण्याचा सर्वोत्तम मार्ग
अंडी खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकतर ते उकडणे आणि मीठ (Salt), मिरपूड (Pepper), कोथिंबीर (Cilantro) घालून सर्व्ह करणे किंवा दुसरे म्हणजे तुम्ही दोन अंडी वापरून व्हेजिटेबल ऑम्लेट बनवू शकता.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Eating Eggs And Diabetes | eating egg daily could increase risk of diabetes cholesterol due to fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीवर कोयत्याने सपासप वार

 

Pune Crime | वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटकांच्या गाडीवर हल्ला; मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांचे कृत्य CCTV कैद

 

Corporator Avinash Ramesh Bagwe | नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांच्या निधीतून प्रभाग 19 मधील ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे भूमिपूजन