रिकाम्यापोटी लसूण खा आणि ‘या’ 8 गंभीर आजारांपासून रहा दूर, होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

लसूण जेवणाला चव येण्यासाठी वापरला जातो. मात्र, याच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. रिकाम्यापोटी लसूण खाल्यास शरीर निरोगी राहते. कोरोनाकाळात सगळ्यांनाच आजारी पडण्याची भीती वाटत असल्याने घरगुती उपायांनी स्वतःला फिट ठेवता येऊ शकते. यामुळे सारखे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1 पचनक्रिया
यामुळे पोटाचे विकार दूर होतात.

2 वजन
वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं.

3 ब्लड क्लोटिंग
रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होते. त्यामुळे ब्लड क्लोटिंग थांबतं.

4 गंभीर आजार
पाण्यासोबत कच्चा लसूण सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने विषारी घटक बाहेर पडतात. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा मार्ग आहे. याद्वारे तुम्ही मधूमेह, कॅन्सर, डिप्रेशन यांसारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव होतो.

5 कोलेस्ट्रॉल, साखर
रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशीर आहे. एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी देखील संतुलित राहते.

6 मजबूत हाडे
लसूण नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. तसेच ऑस्टियोपोरोसिससारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

7 दातांचे आजार
लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दातदुखीचा त्रास असेल लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. दातांमध्ये दुखणे सुरु झाल्यास लसणीचा तुकडा गरम करुन दुखत असलेल्या दाताखाली ठेवा.

8 रोगप्रतिकारकशक्ती
लसूणात अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असल्याने सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.