Gur-Chana Benefits : गुळ-चने खाण्याचे फायदे ! इम्यूनिटी, रक्ताची कमतरता, कमजोरी होईल दूर

पोलिसनामा ऑनलाईन – गरम दूधासोबत गुळ खाल्ल्याने रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढते, यामुळे अ‍ॅनिमिया रोखता येऊ शकतो. रात्री झोपताना हे मिश्रण सेवन करावे. याच्या सेवनाने शरीराची कमजोरी आणि थकवा दूर होऊ शकतो.

गुळ आणि दूध दोन्ही हाडांसाठी फायदेशीर आहे. मासपेशींना पोषण मिळते. सांध्याचे आजार तसेच गाठीचे आजार कमी होतात.

पीरियडमधील वेदना, पेटके यावर सुद्धा दूध आणि गुळाचे सेवन लाभदायक आहे. गुळातील पोटॅशियम शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. पोट कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

नियमित भाजलेले चने आणि गुळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, लैंगिक ताकद वाढते, रक्ताची कमतरता दूर होते. तसेच अनेक आरोग्य समस्या दूर होतात. इम्युनिटी वाढते.

भाजलेल्या चन्यांचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा दूर करता येईल. याच्या सेवनाने चरबी वितळवण्यास मदत होते.

ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी रोज भाजलेले चने खावेत, आराम मिळतो. दिवसभर उत्साह वाटतो.