रोज 2 पेक्षा जास्त अंडी खाणं देऊ शकतं मृत्यूला निमंत्रण ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जर तुम्ही रोज 2 पेक्षा जास्त अंडी खात असाल तर हे तुमच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. अंड्याबाबत करण्यात आलेल्या एका नव्या रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे. रिसर्चनुसार, एखादी व्यक्ती 2 पेक्षा जास्त अंडी खात असेल तर या व्यक्तीला कार्डिओव्हॅक्सुलर डीजीज म्हणजेच हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित आजार होण्याचा आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होणाचा धोका अनेक पटींनी जास्त असतो.

तब्बल 31 वर्षे ठेवली गेली 30 हजार लोकांच्या आहारावर नजर

अमेरिकन मेडिकल असोसिएशन नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये 30 लोकांचा डाएट, आरोग्य आणि त्यांची लाईफस्टाईल इत्यादींवर तब्बल 31 वर्षे लक्ष ठेवण्यात आलं.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसाच्युसेट्सचे प्राध्यापक कॅथरीन टकर सांगतात की, आमच्या रिसर्चचे परिणाम सांगतात की, अंड्यात असणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

एका अंड्यात किती कोलेस्ट्रॉल ?

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार एका मोठ्या अंड्यात साधारण 200 मिलिग्रॅमपर्यंत कोलेस्ट्रॉल असतं. अशात रोज 300 मिलिग्रॅमपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलचं सेवन केलं तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका 17 टक्क्यांनी आणि अकाली निधनाचा धोका 18 टक्क्यांनी वाढतो.

कॅथरीन सांगतात की, माझा सर्वांना हाच सल्ला असेल की, रोज दोन अंडी किंवा 2 ऑम्लेटपेक्षा जास्त ऑम्लेटचं सेवन करू नका. कारण न्युट्रिशनचा अर्थ आहे संयम आणि राईट बॅलन्स.