जास्त हळद खाण्यामुळे होऊ शकतो किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, जाणून घ्या किती खाणं योग्य

पोलीसनामा ऑनलाइन – हळदीचे आरोग्याया कोरोना काळात प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक जण त्यांच्या आहारात रोगप्रतिकारशक्ती बूस्टरवर दुष्परिणाम –  अन्न आणि पेय घेत आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळद अतिशय प्रभावी मानली जाते. स्वयंपाकघरात हळद हा एक अतिशय सामान्य मसाला आहे. हे केवळ अन्नाची चवच वाढवते असे नाही तर अनेक रोग बरे करण्यासदेखील फायदेशीर आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हळदीचे जास्त प्रमाणात सेवन हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणून हळद फक्त मर्यादित प्रमाणातच खावी.

१)किडनी स्टोन
हळदीमध्ये ऑक्जलेट्स आढळतात, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. कारण ऑक्जलेट्स कॅल्शियमसह एकत्रितपणे इनसॉल्यूबल ऑक्जलेट्स ऑक्सालेट तयार करतात. जे किडनी स्टोनसाठी कारणीभूत आहे. म्हणून जास्त प्रमाणात हळद सेवन करणे टाळले पाहिजे.

२)अतिसार
हळद खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. जास्त हळद खाल्ली असेल, तर त्यामुळे पोटात सूज आणि अतिसाराचा धोका वाढतो. ओटीपोटात दुखणे आणि यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात.

३) ॲलर्जी
हळदीमध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे बर्‍याच लोकांना ॲलर्जी होऊ शकते. यामुळे पुरळ आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते. लोक केवळ खाण्यामुळेच नव्हे तर त्वचेवर वापरल्यामुळेदेखील समस्या उद्भवतात.

४) नॉसिया
हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. हे आपल्या अन्ननलिकेवर परिणाम करते ज्यामुळे चक्कर येऊ शकते.

५) लोहाचे शोषण
लोकांनी विशेषत: हळद खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. एका संशोधनानुसार जास्त हळद खाल्ल्याने लोकांच्या शरीरात लोहाचे योग्यप्रकारे शोषण होत नाही.

_किती हळद खावी
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज एक चमचा हळद खाल्ल्याने लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्याचबरोबर जास्त हळद खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.