×
Homeआरोग्यरोज एक चमचा 'साय' खा, निरोगी रहा ; जाणून घ्या

रोज एक चमचा ‘साय’ खा, निरोगी रहा ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – रोज एक किंवा दोन चमचे साय खाल्ल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. सायीमध्ये फॅटी अ‍ॅसिड्स असल्याने हे शरीरातील चरबी जाळण्याचे काम करते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. सायीमध्ये सॅच्युरेटेड फॅट असल्याने कोलेस्टेरॉल कमी होते आणि हृदयासंबंधीच्या समस्येपासून बचाव होतो.

तसेच सायीमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यात फायदेशीर आहे. सायीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. जे अल्सर टाळण्यास मदत करते. सायीमध्ये फॉस्फरस असते. जे दातांना मजबूत ठेवण्यात फायदेशीर आहे. सायीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते. यामधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्स दूर करून सुरकुत्या कमी करते आणि सौंदर्य वाढवते.

यामध्ये व्हिटॅमिन के २ असते. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. हे संधिवात दूर करण्यात फायदेशीर असते. तसेच यामध्ये शॉर्ट चॅन फॅटी अ‍ॅसिड्स असतात. ज्यामुळे पचनात सुधारणा होते. शिवाय सायीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे प्रतिकारशक्ती वाढवून आजार दूर राहतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

Must Read
Related News