नियमित खाल्ल्या जाणाऱ्या डाळींमुळं ‘हे’ 6 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आपण आहारात अनेक डाळींचं सेवन करत असतो. परंतु याचे फायदे खूप कमी लोकांना माहित असतात. डायबिटीज आणि हृदयरोगांसाठी डाळींचा खूप फायदा होतो. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील ही गोष्ट मान्य केली. प्रोटीनुयक्त या डाळींचे अनेक फायदे होतात. याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) डाळीत टॅन्सिन्स, अँटी ऑक्सिडेंट्स असतात. डाळीच्या सेवनानं कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासूनही दूर राहता येतं. यातील तंतुमय पदार्थ शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात.

2) डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांना याचा खूप लाभ मिळतो. यात फायबर्सही जास्त असतात. यामुळं शरीरातील रक्तातील साखरेची पातळी ही व्यवस्थित राहते. यामुळं ब्लडमधील इंसुलिन आणि ग्लुकोज लेवलही कंट्रोलमध्ये राहते.

3) वजन कमी करण्यासाठीही डाळींच्या सेवनाचा खूप लाभ मिळतो. यात आयर्नचं प्रमाण जास्त असल्यानं हृदयदेखील निरोगी राहतं.

4) डाळींचं सेवन केलं तर शरीरातील अपायकारक पदार्थांपासून हृदय, मेंदू, मूत्रपिंड अशा नाजूक आणि महत्त्वाच्या अवयवांचं रक्षण होतं. याशिवाय हाडं, दात आणि नखं देखील मजबूत राहतात. यात भरपूर पोटॅशियम असतं. डाळींचं सेवन केलं तर शरीरात होमोसिस्टेन या द्रव्याची पातळीही योग्य राहते.

5) जर शरीरात आयर्नची कमतरता जाणवत असेल तर उडीद डाळ हा चांगला स्त्रोत आहे. यामुळं शरीराला ताकद मिळते. मासिक पाळीत महिलांनी याचं सेवनं आवर्जून करायला हवं. कारण या दिवसात त्यांना आयर्नची कमतरता भासते.