Health Tips : दररोज या 6 गोष्टींचं करा सेवन, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरीत मिळेल खुप ‘आराम’

पोलीसनामा ऑनलाइन – टोमॅटो खाल्ल्याने शरीरात रक्त वाढते. टामॅटो खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि त्वचादेखील चमकदार होते. टोमॅटो सलाडमध्ये खाल्ल्याने जास्त लाभ होऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा, ज्यांना स्टोनची समस्या आहे त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी करावे.

मनुका सवेन करणे सुद्धा शरीरासाठी खुप लाभदायक आहे. 40 ग्रॅम मनुके कोमट पाण्याने चांगले धुवून घ्या. यानंतर पाव लीटर दुधात टाकून उकळवा. नंतर हे दुध प्या आणि मनुके चावून खा. हे दिवसातून दोन वेळा करा. यामुळे शरीराचा थकवा आणि कमजोरी दूर होईल.

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी पालकचा आहारात समावेश करा. कारण शरीराला सर्वप्रथम रक्ताची आवश्यकता असते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. पालक हा आयर्नचा साठा आहे. नियमित पालक खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि मानसिक तणाव दूर होतो आणि त्वचा उजळते.

केळे खाल्ल्याने ताबडतोब उर्जा मिळते. पोटॅशियम भरपूर असल्याने शरीरात शक्ती आणि चरबी दोन्ही वाढते. दोन केळी जेवणानंतर खा, यामुळे ताकद येईल आणि सौंदर्य वाढेल.

एका दिवसात एक कप अंजीर खाल्ल्याने शरीराला सुमारे 240 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. याशिवाय यामध्ये फायबर, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम सुद्धा असते. रोज रिकाम्यापोटी अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पचनसंबंधी समस्या दूर होतात.

आवळ्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सीडेंट आणि अँटीफ्लेमेट्री तत्व आढळतात, ज्यामुळे हे पुरूषांचे शरीर तरूण बनवतात. केस काळे राहतात. त्वचा तजेलदार होते. यासाठी पुरूषांनी नेहमी याचे सेवन केले पाहिजे. आवळ्याचा मुरंब्बा सेवन करावा.

You might also like