‘त्या’ प्रकऱणी सनी देओलला EC ची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक प्रचाराची सभा घेताना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अभिनेता आणि भाजपचा उमेदवार सनी देओलला नोटीस बजावली आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही त्यांनी पठाणकोट येथे सभा घेतल्याप्रकऱणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सनी देओलला भाजपने गुरुदासपूरमधून उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात कॉंग्रेसचे सुनील जाखड उभे आहेत. गुरुदासपूरमध्ये सनी देओलकडून प्रचार सुरु आहे. दरम्यान  सनी देओलने शुक्रवारी पठाणकोट येथे सभा घेतली. त्यावेळी सभेत एक लाऊड स्पीकर वापरण्यात आला होता. मतदानाच्या आधी ४८ तासांपुर्वीच प्रचाराची वेळ संपते. त्याचवेळी सनी देओलने सभा घेतली.

You might also like