Exit poll बाबत निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणतीही निवडणूक असो, भारतात एक्झिट पोलमधून कल जाणून घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वृत्तवाहिनीच्या या युगात याला महत्व देखील प्राप्त झाले आहे. आता लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी जाहीर होणार असले तरी सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर एक्झिट पोल संदर्भातील ट्विट झळकू लागले आहेत. मात्र याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत आणि ट्विटर इंडियाला आदेश देण्यात आले आहेत. एक्झिट पोलसंदर्भात असलेले सर्व ट्विट तत्काळ हटवण्यात यावेत, असे आदेश इलेक्शन कमिशनने ट्विटर इंडियाला दिले आहेत. या सगळ्यात मात्र १९ मे रोजी शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोल दाखवण्यास आयोगाने सर्व माध्यमांना परवानगी दिली आहे. तसेच यासंदर्भात तीन मोठ्या माध्यमांना आयोगानाने नोटीस देखील पाठवली आहे.

दरम्यान, ट्विटर इंडियाकडून मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात असलेल्या या ट्विट्सला हटवण्याचे आव्हान ट्विटर इंडियासमोर असणार आहे.

You might also like