‘त्या’ वक्तव्यावरून राजू शेट्टींना नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. हातकणंगले  लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी  २४ तासाच्या आत त्या विधानाबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. या वक्तव्यावर त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली होती.

सेन्यात आपली पोरं जातात, देशपांडे, कुलकर्णी सैन्यात जात नाहीत. असं वक्तव्य खासदार राडू शेट्टी यांनी केलं होतं. त्यांनंतर पुण्यातील ब्राम्हण जागृती सेवा संघानं त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच आंदोलन करण्याचा इशारादेखील केला होता.

परंतु याप्रकरणी राजू शेट्टी यांनीदेखील दिलगीरी व्यक्त केली होती. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या जडणघडणीतला अशून शरद जोशी यांच्या संघटनेचा मला वारसा लाभलेला आहे. माझ्या मनाला जातीयवाद शिवू शकत नाही. माझ्य़ाकडून अनावधानानं बोलताना उल्लेख झाला. माझा मुळ हेतू शहीद जवान व त्यांच्या वारसांना न्याय देण्याचा होता. कुणीही त्याचं वाईट वाटून घेऊ नये असं म्हणत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

त्यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांना या वक्तव्याबाबत खुलासा करण्याची नोटीस पाठविली आहे. त्यांना २४ तासात खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.