केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे जखमी झालेल्या ‘प्रिन्स’चा अखेर मृत्यु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात प्रिन्स या तीन महिन्यांचे बाळ जखमी झाले होते. त्याचा आज पहाटे पावणेतीन वाजता मृत्यु झाला.

केईएम रुग्णालयात प्रिन्स राजभर याला दाखल केले होते. ७ नोव्हेंबर रोजी त्याचा ईसीजी काढण्यात येणार होता. त्यावेळी ईसीजी मशीनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादी जळाली होती. त्यात प्रिन्स याचा कान व एक हात होरपळला होता. त्यामुळे त्याचा कान आणि हात कापण्याची वेळ आली होती. गेले काही दिवस त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कालपासून त्याची प्रकृती चिंताजनक होती.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला ह्दयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यात प्रयत्न केला. पण त्यात त्याचे पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे़ . जानेवारी २०१८ मध्ये लालबाग येथील राजेश मारू यांचा नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये खेचल्यामुळे मृत्यू ओढवला होता.

Visit : Policenama.com