दसर्‍याला खरेदी राहून गेलीय तर ‘नो-टेन्शन’, पुन्हा ऑनलाइन सेलमध्ये ‘सुवर्ण’संधी, 90 % सूट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वेळेस ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करणं राहून गेलं असेल तर काळजी करू नका. अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या इ कॉमर्स वेबसाईट पुन्हा एकदा मोठा सेल सुरु करणार आहेत. ज्यामध्ये फॅशन ब्रँड वर 90 % तर मोबाइलवर 40 % आणि घरगुती उपकरणांवर 60 % पर्यंत सूट मिळेल. त्याचप्रमाणे ठराविक बँक धारकांनी आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 25 % कॅश बॅकची देखील ऑफर देण्यात आली आहे.

अमेझॉनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या आधीचा सेल 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान पार पडला आहे. दुसरा सेल रविवार पासून सुरु होणार आहे आणि तिसरा सेल धनत्रेयदशीच्या दिवशी होणार आहे.

मिळणार 10 % इंस्टंट सूट –
अमेझॉनच्या आगामी सेल 13 ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार असून या दरम्यान आयसीआयसीआय च्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास इंस्टंट 10 % कॅशबॅक मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्मार्टफोन, टीव्ही, कपडे अशा सर्वच गोष्टींवर यावेळी मोठी सूट मिळणार आहे. श्याओमी, वन प्लस, सॅमसंग, वीवो अशा प्रकारच्या अनेक कंपनीच्या फोनवरती 40 % पर्यंत सूट मिळणार आहे.

छोट्या शहरांवर आणि गावामधे फोकस –
स्नॅपडील द्वारा 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान सेलचे आयोजन केले जाणार आहे. कंपनी बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यावर 10 % अतिरिक्त सूट देणार आहे. त्याचप्रमाणे याच बँकेच्या डेबिट कार्डवर 20 %, रुपेच्या डेबिट, क्रेडिट कार्ड वर 20 %, पंजाब नेशनल बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्डवर 25 %, रत्नाकर बैंक लिमिटेडच्या डेबिट, क्रेडिट कार्डवर 15 % आणि फेडरल बँकेच्या डेबिट कार्डवर 15 % सूट दिली जाणार आहे.

स्नॅपडीलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी त्यांचा फोकस छोट्या छोट्या खेडेगावांवर आहे. कारण ग्रामीण भागातील अनेक लोकांचे जनधन खाते आहे आणि त्यांना रुपेचे डेबिट कार्ड आहे. त्यामुळे कंपनीने त्यावरून खरेदी करणाऱ्यांना देखील मोठी सूट दिली आहे.

फ्लिपकार्टचा अमेझॉन प्रतिस्पर्धी –
फ्लिपकार्टचा पुढील सेल 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. अमेझॉनचा प्रतिस्पर्धी असलेल्या या कंपनीने आपल्या सेलमध्ये देखील अशाच विशेष ऑफर दिलेल्या आहेत. मात्र कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबद्दल विस्तृत माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, फ्लिपकार्ट अमेझॉनच्या तुलनेत जास्त मोठी ऑफर देत आहे. फ्लिपकार्टकडून एसबीआयच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरून 10 % इंस्टंट सूट दिली जाणार आहे.

Visit : Policenama.com