Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी, फायनान्स विधेयकासह 20 विधेयकं होणार सादर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 29 जानेवारीला अर्थव्यवस्थेच्या सर्वेक्षणासह 20 नवे विधेयकं सादर करणार आहे. या नव्या विधेयकात क्रिप्टोकरन्सी, इन्फ्रा बँक आणि फायनान्स विधेयकाचा समावेश आहे. या सर्व विधेयकांना येत्या एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मंजूरी मिळेल.

क्रिप्टोकरन्सी, इन्फ्रा बँकेसह इतर काही विधेयकं संसदेत सादर केली जाणार आहेत. याशिवाय CCI संशोधन बिल, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (संशोधन) बिल, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलप्मेंट बिल यांसारख्या विधयेकांचा समावेश आहे.

‘या’ बिलांचाही होणार समावेश

– क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल

– मायनिंग आणि मिनरल्स (डेव्हलप्मेंट अँड रेग्युलेशन) संशोधन बिल

– इलेक्ट्रिसिट (संशोधन) बिल

दरम्यान, केंद्र सरकारने संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिटकॉईनवर बंदी घालणारे विधेयक तयार केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही (RBI) रुपयाची डिलिटल करन्सी आणण्याची योजनेवर काम सुरु केले आहे. त्यानुसार आता क्रिप्टोकरन्सी बंद होण्याची शक्यता आहे.