अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकारकडून ‘या’ 4 मोठ्या घोषणा ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्र सरकार देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी मदत निधीची घोषणा करण्याच्या तयारी आहे. सरकार लवकरच या संबंधित घोषणा करु शकते. वाहन निर्मिती क्षेत्राची ढासळती अवस्था सावरण्यासाठी मोदी सरकार मदत निधीची घोषणा करु शकते. यासाठीची 3 दिवसीय बैठक पंतप्रधान कार्यालयात पार पडली.

1. या क्षेत्रांना मिळणार दिलासा –
वाहन निर्मिती क्षेत्रातसह 4 इतर क्षेत्राला मदत निधीची पूर्तता करण्यात येणार आहे. यात वित्तीय क्षेत्र, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, रियल इस्टेट,बँक आणि एनबीएफसीचा समावेश आहे.

2. परदेशी गुतंवणूकदारांना अटी करणार शिथिल –
सरकार फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टर्सचा उपकर रद्द किंवा कपात करण्याची शक्यता आहे. परकीय गुंतवणूकदारांना काही अटी शिथिल करण्यात येतील.

3. बँक आणि NBFC वर विशेष लक्ष –
सरकारचे बँक आणि NBFC वर विशेष लक्ष असणार आहे.
NBFC क्षेत्रांना सध्या अडथळे येत आहेत, यासाठी सरकार मदत निधीची घोषणा करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय सरकार रियल इस्टेट क्षेत्रात पावले उचलणार आहे.

4. MSME संबंधित मोठ्या घोषणेची शक्यता –
MSME साठी कर्जासाठी विशेष तयारी करण्याची शक्यता आहे. याबरोबरच सरकार रोजगार निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष देत आहे. लवकरच सरकार यासाठी मोठी घोषणा करु शकते.