अच्छे दिन ! 25 लाखांपर्यंतची ‘थकबाकी’ असणार्‍या करदात्यांवर कारवाई होणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक परिस्थितीमुळे विरोधाकांकडून मोदी सरकाराला घेरण्यात येत असताना आता अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पुन्हा एका अर्थव्यवस्थेबाबत माहिती देत निर्णयांची घोषणा केली. या वेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आमचा फोकस होम बायर्स, निर्यात आणि कर सुधारणांवर आहे.

यावेळी त्यांनी माहिती दिली की, आता छोटे थकबाकीदार असलेल्यांवर आता कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही. परंतू 25 लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजूरी आवश्यक असेल.

निर्मला सीतारामण यांच्या मते एप्रिल – जून महिन्यात रिवाइलचे संकेत मिळाले आहेत. याशिवाय क्रेडिट गारंटी स्कीमचा फायदा एनबीएफसीला होईल. तसेच क्रेडिट आउटफ्लोच्या माहितीसाठी 19 सप्टेंबरला PSU बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेण्यात येईल.

निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, निर्यातीसाठी एक नवी योजना लॉन्च करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 मध्ये मर्चन्डाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडियन स्कीम्स म्हणजेच MEIS च्या जागी नवी योजना आरओडीटीईपी (RoDTEP) ला लॉन्च करण्यात आले आहे. नव्या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 50 हजार कोटीचा बोझा पडेल. तसेच निर्यातीमध्ये ई – रिफंड लवकर लागू होईल.

निर्यातीला प्रोस्ताहन देताना मार्चमध्ये 4 मेगा फेस्टिवलचे आयोजन करण्यात येईल. हे फेस्टिवल 4 विविध शहरात आयोजित करण्यात येतील. देशातील सर्व पोर्टवर मॅन्युअर क्लिअरेंस डिसेंबर 2019 पर्यंत रद्द करण्यात येईल.

याआधी देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली होती, यावेळी त्यांनी सांगितले होते की, सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भविष्यात अनेक निर्णय घेण्यात येतील. त्यानंतर त्यांनी आज बैठक घेत अनेक निर्णयांची माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या