UP मधील गंगेतील मृतदेहांची महाराष्ट्रात चर्चा होते, पण बीडमधील मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा होत नाही – देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  उत्तर प्रदेशमधील 50 मृतदेह गंगेमधून वाहत बिहारमध्ये गेले. हे चुकीचे आहे. याचे कोणी समर्थन करू शकत नाही. पण या विषयावर महाराष्ट्रात चर्चा झाली. पण बीडमध्ये 22 मृतदेह एका रुग्णवाहिकेत कोंबून त्यांची विटंबना करुन स्मशानात नेऊन टाकून दिले. याबद्दल काहीच चर्चा झाली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यामध्ये प्रचार करण्यासाठी एक यंत्रणा उभारली असून त्या माध्यमातून काम केलं जात असल्याची टीका करताना त्यांनी केली आहे. ठाकरे सरकारने उभारलेल्या या प्रचारकी यंत्रणेला इकोसिस्टीम (Ecosystem) असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Dark Mode : डार्क मोडमध्ये कधीही वापरू करू नका स्मार्टफोन, होऊ शकते मोठे नुकसान

देवेंद्र फडणवीस एका वेबिनार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकार रोज सकाळी एखादी खोटी किंवा दिशाभूल करणारी बातमी सोडून ती इकोसिस्टीमच्या (Ecosystem) माध्यमातून वाजवते, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मात्र समाज माध्यमांवर सर्वात मोठी इकोसिस्टीम (Ecosystem) भाजपाची असतानाच महाराष्ट्र सरकारच्या या इकोसिस्टीमला उत्तर देण्यास भाजपाची इकोसिस्टीम कमी पडली का? असा सवाल विचारला असता समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमे भाजपावर हवी तेवढी टीका करु शकतात, त्यासंदर्भात कुठलीच अडचण नाही.
मात्र शिवसेनेच्याविरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्याविरुद्ध किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एक जरी पोस्ट टाकली तरी नोटीस देण्यात येते. आमच्या 10 हजार कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नोटीसा दिल्या आहेत, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात 5 टप्प्यात Unlock ! नियमावली जाहीर, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, जाणून घ्या

40 टक्के मृत्यू लपवल्याचे बोललो तर गैर काय ?

मुंबईमध्ये 40 टक्के मृत्यू हे इतर कारणांमुळे असल्याचे दाखवले जात आहे.
ज्या देशात 0.7 टक्के आणि महाराष्ट्रात 0.8 टक्के मृत्यू आहेत.
पण मुंबईत 40 टक्के असे मृत्यू दाखवले जात असतील आणि माध्यम प्रश्न विचारणार नसतील तरी मी विचारणार आहे.
एकट्या मे महिन्यात 26 हजार मृत्यू झाले. मुंबई पॅटर्न सांगितला जातोय.
जुन्या पिकच्या दोन महिन्यातही 26 हजार मृत्यू झाले नव्हते.
एका महिन्यात महाराष्ट्रात 26 हजार लोक गेले आहेत.
मुंबईतील 40 टक्के मृत्यू धडधडीतपणे लपवले जात आहेत.
आता याच्यावर मी बोललो तर त्यात गैर काय असा सवाल फडणवीसांनी केला आहे.