ED प्रकरण : शिखर बँक घोटाळ्यात 17 भाजपच्या नेत्यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सहकारी बँक भ्रष्टाचार प्रकरणात शिवसेना भाजपच्या आजी-माजी नेते आहेत. पण नाव फक्त आमच्याच नेत्यांची येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. भाजपच्या 17 नेत्यांची यामध्ये नावे असताना फक्त पवार यांचेच नाव पुढे येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी शुक्रवारी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्याचे गूढ वाढले होते. अखेर शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील हेही अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, राज्य सहकारी बँक ही कर्ज वाटपाचे काम करते. त्यात भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. त्याचा माध्यमांनी तपशील तपासून घ्यावा. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत असताना पक्षातील नेते अजित पवारांच्या पाठिशी का उभे राहिले नाही ? यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, आम्ही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे होतो. मुळात या बँकेच्या संचालकपदावर अनेक शिवसेना आणि भाजपचे आजी-माजी नेते आहेत. पण, नाव फक्त आमच्याच नेत्यांची येतात.

संचालक मंडळातील सर्वपक्षीय नेते
अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, माणिकराव पाटील, निलेश बाळासाहेब नाईक, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, अमरसिंह पंडीत, सदाशिव मंडलीक, यशवंतराव मंडलीक, यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, तानाजी चोरगे, मिनाक्षी पाटील, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देवीदास पिंगळे, जयवंतराव आवळे, कै. पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, राजन तेली, अमरसिंह पंडीत, शेखर निकम, गंगाधर कुंटुरकर.

Visit : Policenama.com