ED Action On Jacqueline Fernandez | बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा धक्का; इतक्या कोटींची संपत्ती जप्त !

0
235
ED Action On Jacqueline Fernandez report ed attaches assets worth rs 7 crore of jacqueline fernandez in money laundering case
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अडचणीत आली आहे. जॅकलीनची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने (ED Action On Jacqueline Fernandez) जप्त केली आहे. ईडीने (ED Action On Jacqueline Fernandez) जॅकलीनच्या सात कोटी रूपयांच्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत.

 

जॅकलीनला या भेटवस्तू सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने दिल्याची माहिती आहे. मात्र सुकेश चंद्रशेखरने लोकांकडून जबरदस्तीने वसूल केलेल्या पैशातून या भेटवस्तू दिल्याचं ईडीने सांगितलं आहे. जप्त झालेल्या संपत्तीमध्ये जॅकलीनच्या 7.12 कोटींच्या फिक्स डिपॉझिटचाही समावेश आहे. (ED Action On Jacqueline Fernandez)

सुकेशने जॅकलीनच्या घरच्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याचंही समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलीनची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी सुकेश आणि जॅकलीनचे फोटो (Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar Viral Photo) सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते. तिच्या आणि सुकेशच्या अफेरबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

 

सुकेशने एका महिलेला तिच्या पतीला जामीन मिळवून देतो सांगत 200 कोटी रूपयांची फसवणूक केली होती.
या प्रकरणात सुकेश हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये (Tihar Prison) आहे.
महत्त्वाचं म्हणजे त्याने ही फसवणूक तुरूंगात असताना केली होती.
या प्रकरणामध्ये तो जर दोषी आढळला तर त्याला 7 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जॅकलीनचा सुकेशसोबत सेल्फी व्हायरल झाला होता त्यासोबतच नोरा फतेही (Nora Fatehi) नाव जोडलं जात होतं.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- ED Action On Jacqueline Fernandez | report ed attaches assets worth rs 7 crore of jacqueline fernandez in money laundering case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा