निवडणुकीनंतर काँग्रेसला आणखी एक ‘झटका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मनी लँड्रींग प्रकरणात वाड्रा यांचा जामीन रद्द करावा, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरावाजा ठोठावला आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात विदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेला ईडीने विरोध केला आहे. यामुळे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रॉबर्ड वाड्रा यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या विदेश दौऱ्याची माहीती कोणालाही देण्यात येऊ नेये अशी विनंती वाड्रा यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. तसेच सरकारी वकील युक्तीवाद करण्यासाठी न्यायालयात हजर नसल्याने वाड्रा यांची सुनावणी २४ मेला घेण्यात यावी अशी विनंती देखील वाड्रा यांच्या वकिलाने विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्याकडे केली आहे.

मागील वर्षी १ एप्रिल रोजी वाड्रा यांना न्यायालयाच्या पुर्व परवानगी शिवाय देश सोडून जाऊ नये या अटीवर वाड्रा यांना जामीन देण्यात आला होता. आता वाड्रा यांनी न्यायालयात विदेशात जाण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरून ईडीने त्यांचा जामीन रद्द करावा असा अर्ज न्यायालयात केला आहे.

You might also like