ED Arrest Mumbai Former CP Sanjay Pandey | माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Arrest Mumbai Former CP Sanjay Pandey | बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग प्रकरणी (Illegal Phone Tapping Case) माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai CP) संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आरोपी करण्यात आली आहे. संजय पांडे यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक (ED Arrest Mumbai Former CP Sanjay Pandey) करण्यात आले.

 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात सीबीआयने (CBI) संजय पांडे यांची चौकशी केली. तर एनएसई (NSE) कंपनी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली. दिल्लीतील ईडीच्या कार्य़ालयात त्यांची चौकशी सुरु होती. सोमवारी सीबीआयने प्रथम पांडे यांची चौकशी केली.

 

संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.

संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (National Stock Exchange)
कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे.
पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करुन
हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे.

 

Web Title :- ED Arrest Mumbai Former CP Sanjay Pandey | former mumbai police commissioner sanjay pandey arrested by ed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

 

MP Rahul Shewale | युतीसाठी उद्धव ठाकरेंची PM नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचे गौप्यस्फोट

 

Eknath Shinde | बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते; CM एकनाथ शिंदेंना नुसते आमदार, खासदार पुरेसे नाहीत?

 

New Labour Code 2022 | नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी लवकर? Modi Government ’या’ महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम

 

MP Rahul Shewale | युतीसाठी उद्धव ठाकरेंची PM नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचे गौप्यस्फोट