ED Arrest Vinay Aranha | पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हानाला ईडीकडून अटक; 20 मार्चपर्यंत ईडीची कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ED Arrest Vinay Aranha | पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना (Rosary School Director Vinay Aranha) याला ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे (ED Arrest Vinay Aranha). न्यायालयाकडून विनय आर्‍हाना याला 20 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. आर्‍हानाच्या अटकेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

कॉसमॉस बँकेकडून (Cosmos Bank) आर्‍हानाने फसव्या पध्दतीने कर्ज घेतले. शाळांचे नुतणीकरण करण्यासाठी सदरील कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र, कर्जाव्दारे मिळालेल्या पैशाचा उपयोग आर्‍हानाने हायफाय लाईफस्टाईल जगण्यासाठी तसेच बॉलीवूडमधील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला असल्याचा आरोप आहे.

अंमलबजावणी संचालनायाकडून (ED) सुरू असलेला तपास हा सध्या प्राथमिक स्तरावर आहे.
त्याचा सखोल तपास करण्यासाइी आर्‍हानाची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे.
सदरील तपास हा अत्यंत प्राथमिक टप्प्यावर असून आर्‍हानाची कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.
पीएमएलएच्या तरतुदीनुसार नोंदवलेल्या जबाबांसह तपासाचा मोठया नोंदी मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर गुन्हयात आर्‍हानाचा सहभाग दर्शवित आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने आर्‍हानाच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
न्यायालयाने विनय आर्‍हानाला 20 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Web Title : ED Arrest Vinay Aranha | pune Rosary School Director Vinay Aranha remanded ed custody for fraudulently obtaining loans

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Palghar Crime News | चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पाहुण्यांना घरी सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू