Yes Bank घोटाळ्यातील आरोपी बाधवान बंधूंना ED कडून अटक, 10 दिवसांची कोठडी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  Yes Bank मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि DHFL चे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अटक केली. त्यांना येस बँक आर्थिक घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीकरिता विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 10 दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी मााहिती मुंबई पोलिसांनी दिली.

संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू असताना, प्रवासाला बंदी असतानाही मुंबईहून गाडीने प्रवास करत उन्हाळ्यात महाबळेश्वरला फिरायला गेल्यामुळेही हे दोघे बंधू चर्चेत आले होते. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या चिठ्ठीच्या आधारे वाधवान कुटूंब महाबळेश्वरला पोहोचले होते. नंतर त्यांना क्वारंटाइन करून पुन्हा अटक करून मुंबईला पाठवण्यात आले. न्यायलय 10 दिवसांनी पुढील सुनावणी करणार आहे.