6 देशांना वॉन्टेड असलेला हवाला किंग नरेश कुमार जैनला ED नं केलं अटक, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हवाला रॅकेटचा खुलासा करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, नेदरलँड्स आणि युएईसह किमान सहा देशांमध्ये अंडरवर्ल्ड हवाला व्यापारी नरेश जैनला अटक केली आहे. ईडीने हवाला व्यावसायिक नरेश जैनला मनी लॉन्ड्रींगच्या एका प्रकरणात अटक केले आहे, जे मागील काही वर्षात अनेक व्यापारी, ड्रग माफिया आणि अन्य गुन्हेगारी नेटवर्कसाठी ५५० हून अधिक बनावट कंपन्यांचा उपयोग करून एक लाखो कोटी रुपयांपेक्षा अधिक संशयास्पद व्यवहाराशी संबंधित आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, नरेश जैनला (६२) मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट) या कलमांतर्गत अटक केली गेली आहे आणि त्याला रोहिणी येथील स्थानिक कोर्टाने नऊ दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. तपास यंत्रणेने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, ‘मनी लॉन्ड्रिंग आणि आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहार’ या भूमिकेसाठी जैनला सध्या सुरू असलेल्या पीएमएलए चौकशीत अटक करण्यात आली आहे.

याअंतर्गत ५५४ बनावट किंवा संशयास्पद कंपन्या, किमान ९४० संशयित बँक खाती आणि १.०७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या मनी ट्रान्सफरचा तपास सुरू आहे, जे देशातील सर्वात मोठे हवाला आणि व्यवसाय आधारित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीच्या तपासात काही ‘मोठ्या कॉर्पोरेट्स’ आणि एक मोठी परकीय चलन कंपनी आहे.

ईडी दोन मनी लॉन्ड्रींग कलमांतर्गत नरेश जैन आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध चौकशी करत आहे, जे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) २०१८च्या एफआयआर आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) एका फौजदारी तक्रारीवर आधारित आहे. एनसीबी प्रकरणातून डिसेंबर २००९ मध्ये उद्भवलेल्या पीएमएलए प्रकरणात जैनला ईडीने २००९ मध्ये अटक केली होती.

दिल्लीच्या या व्यावसायिकाची अटक पोलिस ईओडब्ल्यूने दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात झाली आहे, जी फसवणूक, बनावट आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली त्याला ईडीने पाठवलेल्या एका तक्रारीच्या आधारे नोंदवली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीने ईओडब्लू एफआयआरच्या आधारे पीएमएलए प्रकरण दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय राजधानीच्या रोहिणी आणि विकासपुरी भागात जैन आणि त्याच्या साथीदारांच्या परिसरात छापा टाकला होता आणि ‘विदेशी बँक खाती’ चालवण्यासाठी १४ डिजिटल की जप्त केल्या होत्या, ज्याचा उपयोग टेलीग्राफिक ट्रान्सफरसाठी केला गेला. तसेच कथित शेल फर्मशी संबंधित पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह इत्यादी संबंधित कागदपत्रे जप्त केली होती.

अधिकाऱ्यांच्या मते, एजन्सी ३३७ परदेशी बँक खात्यांची चौकशी करत आहे, जी दुबई, हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशात आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, असे आढळले कि भारतात घेतलेली रोकड ‘बनावट’ टूर आणि ट्रॅव्हल कंपन्या व टेलिग्राफिक ट्रान्सफरद्वारे परदेशी बँक खात्यात पाठवली गेली आणि ती परदेशी लाभार्थ्यांनासाठी पाठविली गेली.

सूत्रांनी सांगितले की, एजन्सीने ९७० लाभार्थींची ओळख पटवली आहे, ज्यांना आतापर्यंत सुमारे १८,६८० कोटी रुपयांची संशयास्पद रक्कम हस्तांतरित केली गेली आहे. ईडीने एका निवेदनात म्हटले की, जैनने ११४ परदेशी बँक खात्यात ११,८०० कोटी रुपयांचा हवाला केल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले की, एजन्सीने अनेक बनावट कागदपत्रे, मार्कशीट, जन्म प्रमाणपत्रे, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत आणि त्या आधारे संशयित बँक खाती आणि शेल फर्म कथितपणे चालवली जात होती.

जैन बराच काळ तपास यंत्रणांच्या रडारवर होते आणि २०१६ मध्ये ईडीने त्याला परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली १२०० कोटी रुपयांची नोटीसही बजावली होती. एजन्सीनुसार, जैन वर्षानुवर्षे मनी लाँड्रिंग आणि ‘हवाला’ पैशाच्या व्यवहारात आहे. तसेच त्याच्यावर ड्रग टोळ्यांना निधी पुरवल्याचा देखील आरोप आहे आणि यापूर्वी ड्रग कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्याला अटकही केली होती.

ब्रिटनच्या सीरियस ऑर्गनाइज्ड क्राइम एजन्सीने (एसओसीए) २००९ मध्ये भारताला जैन आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लाँडरिंगच्या कथित घटनांबद्दल अहवाल दिला होता, जेव्हा तो दुबईमध्ये होता. त्याला आणि इतर नऊ जणांना दुबई पोलिसांनी फेब्रुवारी २००७ मध्ये अशाच गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक केली होती आणि नंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, जैन २००९ मध्ये दुबईहून पळून गेला आणि त्यावेळी त्याच्याविरुद्ध इंटरपोलचे दोन जागतिक अटक वॉरंट जारी होते.