दिनेश जजोडिया यांची ८३४ कोटींची संपत्ती जप्त

दुबई : पोलीसनामा ऑनलाइन
न्यायालयाने आर्थिक घोटाळेबाजांना वठणीवर आणण्यासाठी विशेष अधिकार ईडीला दिले आहेत. या अधिकारांची त्वरित अंमलबजावणी करण्यास ईडीने सुरवात केली असून, आज मुंबईतील या खासगी कंपनीचा संचालक दिनेश जजोडिया (वय :५१) (सीए)ची दुबईतील तब्बल आठशे चौतीस कोटींची संपत्ती जप्त केली असून त्याला अटक देखील झाली आहे.

दिनेश जजोडियांवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. दिनेश ब्रिटन,दुबई,हॉंगकॉंगमधील मोठ्या कंपन्यांचे अधिकृत कर्मचारी होते. या कंपन्यांच्या गुंतवणुकी देश-विदेशात करण्याबाबत विदेशी चलन परिवर्तनीय बॉण्ड (foreign currency convertible bonds) करण्यामध्ये त्यांची चौकशी सुरू होती. हे करार तब्बल ८३४ कोटींचा असल्याची शक्यता आहे.

ईडीने दिलेल्या अधिकृत पत्रात दिलेल्या माहितीनुसार,” दिनेश जिओडेस्टीक लिमिटेड कंपनीत सीए आणि कर सल्लागार म्हणून काम करत होते. जिओडीकिक लिमिटेडने एफसीसीबी अंतर्गत 125 मिलियन डॉलर्सची उभारणी केली होती, ज्यासाठी सिटीबँक, लंडन यांनी ट्रस्टी म्हणून काम केले. या निधीचा वापर विदेशी सहाय्यक किंवा नवीन विदेशी अधिग्रहणांमध्ये गुंतवणूक म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. १२५ मिलियन डॉलरची ही रक्कम प्रथम सिटीबँक लंडनच्या परदेशी खात्यात जमा करण्यात आली आणि त्यानंतर थेट जिओडेस्टीक होल्डिंग्स लिमिटेड कंपनीच्या मॉरीशस आणि हॉंगकॉंग येथील परदेशी सहयोगी कंपन्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

या मॅच्युरिटीनंतर, जिओडेसिक लिमिटेड 157.06 मिलियन डॉलर्सच्या परतफेडसाठी सिटीबँक, लंडनला दिलेल्या वचन बद्धतेचे पालन करण्यात अयशस्वी ठरले असे त्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे.

सीबीआयने त्याच्या चौकशी संदर्भात सांगितले की,जजोडियाने स्वतः:च्या फायद्यासाठी गैरव्यवहारातून विविध देशांतील कंपन्यातील भागधारकांना तसेच एफसीसीबी धारकांना (विदेशी गुंतवणूकदारांना) फसवल्याचा गुन्हा ठेवला आहे.