ED Attached Sanjay Raut’s Property | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ED Attached Sanjay Raut’s Property | महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांवर गेल्या अनेक दिवसापासून सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केली आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज (मंगळवारी) ईडीने दणका दिला आहे. संजय राऊत यांचे अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील राहत्या घरावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

आज ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, ”राजकीय सूड आणि बदला कोणत्या थराला जाऊन कारवाया होतात हे पाहायला मिळतंय.
आमचं राहातं घर जप्त केलंय भाजपचे लोकं आनंदाने उड्या मारतायत, फटाके वाजवतायत,
मराठी माणसाचा एक हक्काचा फ्लॅट जप्त केल्याने त्यांना आनंद झालाय,” असं ते म्हणाले आहेत.

 

पुढे संजय राऊत म्हणाले, ”2009 साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली जागा आणि घर त्याची साधी आमच्याकडे कुणी चौकशी केली नाही, विचारणा केली नाही.
एक रुपया जरी मनीलॉन्ड्रींग प्रकरणातला पैसा आमच्या खात्यात आला असेल तर सर्व प्रॉपर्टी आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत.” असं ते म्हणाले.
त्याचबरोबर ‘एक एकरही जागा नाही, आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांनी अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या छोट्या छोट्या जागा आहेत.
आता ईडी मनीलॉन्ड्रींग दिसायला लागलं आहे. कारवाई केली आहे, यातून पेरणा मिळते लढण्याची,’ असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- ED Attached Sanjay Raut’s Property | shivsena mp sanjay raut first reaction after ed action on his property

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा