नागपूरमधील इम्प्रेस मॉल ईडीकडून जप्त

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अंमलबजावणी संचलानालयाने (ईडी) नागपूरमधील इम्प्रेस मॉलवर जप्तीची कारवाई केली आहे. केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमीटेडच्या मालकीचा ४३८ कोटी रुपये किंमतीचा इम्प्रेस मॉल ईडीने जप्त केला. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमीटेडवर ईडीने ही कारवाई केली. नागपूरमध्ये २ लाख ७० हजार चौरस फुटांचा हा शपिंग मॉल आहे. याची किंमत ४३८ कोटी रुपये आहे. मुंबईतील तायल ग्रुपच्या मालकीची ही कंपनी आहे. तायल ग्रुपविरोधात सीबीआयने तीन वेगवेगळ्या तक्रारींची दखल घेऊन ईडीने कारवाईला सुरुवात केली. २००८ मध्ये ग्रुपच्या अक्टिफ कॉर्पोरेशन लि., जय भारत टेक्सटाईल्स अँड रियल इस्टेट लि. एस्के नीट (इंडीया) या कंपन्यांनी बँक ऑफ इंडीया आणि आंध्र बँकेकडून २००८ मध्ये ५२४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यात बँकांना फसवलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like