मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीने कारवाईला सुरुवात केली आहे. भाजपाच्या जवळचे असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित ९ ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. रत्नाकर गुट्टींशी संबंधित परभणी, नागपूर आणि मुंबई याठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी २ हाजार २९८ शेतकऱ्यांच्या नावे सहा बँकेतून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. ज्यांच्या नावावर कर्ज घेतले आहे त्यातील काहीजणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नाकर गुट्टे यांनी सहा सहकारी बँकेतून शेतकऱ्यांच्या नावे ३२८ कोटींचे कर्ज घेतले आहे. गुट्टे यांनी आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक आणि आरबीएल बँकेकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज घेताना गुट्टे यांनी मृत झालेल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र देऊन त्यांच्या नावे कर्ज घेतले होते.
रत्नाकर गुट्टे हे भाजपाच्या जवळचे आहे. तसेच ते द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचे निर्माते असलेल्या विजय गुट्टे यांचे वडील आहेत. विजय गुट्टे यांना जीएसटीमध्ये ३४ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.