मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं ‘मज्जा’साठी उडवले एका रात्रीत 7.8 कोटी : ED

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा मोजर बेयरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याने परदेशात मौजमजेसाठी लाखो रुपये उधळल्याची बाब सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीदरम्यान समोर आली आहे. रतुल पुरी यांच्यावर ऑगस्टा वेस्टलंड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा आरोप आहे. बॅंक कर्ज आणि हवाला व्यवहारप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, या गैरव्यवहाराची व्याप्ती तब्बल आठ हजार कोटी रुपये एवढी आहे.

ईडीने न्यायालयात मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात 8 हजार कोटी लोन तर मनी लॉन्ड्रिंगसंबंधीत न्यायालयात एकूण 110 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार , रतुल पुरीने त्याच्या मौजमजेसाठी तसेच आलिशान जीवनशैलीसाठी चक्क दुबईमधील हवाला ऑपरेटरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे.

या पैशाचा वापर करत त्याने जगभर खासगी विमानांतून प्रवास केला, अनेक नाईट क्‍लबलाही भेटी दिल्या. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील गुन्हेगारीविषयक तरतुदीअंतर्गत मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात हा खटला दाखल करण्यात आला असून, तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या बॅंक कर्जाचा बेकायदा वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

visit : Policenama.com