ED नं जप्त केली माजी IAS अधिकार्‍याची 36.12 कोटींची मालमत्ता, सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात कॅडरचे माजी आयएएस अधिकारी संजय गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाची 36.12 कोटी रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने ही माहिती दिली. भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) 1985 च्या बॅचचे अधिकारी संजय गुप्ता यांनी 2002 मध्ये नोकरी सोडली आणि नंतर नीसा ग्रुप ऑफ कंपनीज या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला.

गुप्ता हे एप्रिल 2011 पासून ऑगस्ट 2013 पर्यंत एमइजीएचे अध्यक्ष होते. ईडीने त्यांच्याविरोधात अफ़रातफ़रीचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने सांगितले की, तपासाच्या वेळी गुप्ता हे एमईजीएचे अध्यक्ष असताना त्यांनी मनमानी पद्धतीने काम करत त्यांच्या ओळखीच्या लोकांना वेगवेगळ्या पदांवर नियुक्त केले होते अशी माहिती समोर आली आहे. ईडीने ने आरोप लावला आहे की, त्यांनी या नातेवाईकांच्या नावाने अनेक नकली कंपन्या सुरु केल्या आणि 2012 – 13 दरम्यान बँक खाते खोलले.

ईडीने ने गुप्ता, पत्नी निलू सोबत निसा ग्रुप कंपनीच्या नावावर असलेली संपत्ती जसे की, लिजर लिमिटेड, नीसा टेक्नोलॉजी, नीसा एग्रीटेक आणि फूड्स लिमिटेड ला जप्त करण्याचे अस्थायी आदेश दिले आहेत. तसेच अहमदाबाद येथील सॅटेलाईट टॉवर सहित अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.

एजन्सीने आरोप केला आहे की, यामध्ये सामील असलेल्या काल्पनिक कंपन्यांनी माल किंवा सेवांची पूर्तता न करता एमईजीए कडून नकली बिल दिले आहे. आणि याला अंतिम मंजुरी गुप्ता यांनी दिली कारण त्यांच्याकडे प्रशाकीय आणि आर्थिक अधिकार होते असा आरोप एका अधिकाऱ्यानी केला आहे. आता ईडीने हे प्रकरण हातात घेतले आहे. गुप्ता यांना सीआयडीने मेट्रो लिंक प्रोजेक्टमध्ये 113 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी 2015 मध्ये अटक देखील केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/