ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना खा. भावना गवळींच्या अडचणीत आणखी वाढ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – ED | काही दिवसांपुर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेत्या आणि वाशीम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या काही संस्थावर छापेमारी केली होती. त्यावेळी गवळी या चांगल्याच अडचणीत आल्या. यानंतर आता आणखी त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसत आहे. ईडीने आता परभणी येथील पाथरी (Pathari) याठिकाणी मोठी कारवाई केलीय. यातच भावना गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान (Saeed Khan) यांना अटक (Arrested) ईडीने अटक केली आहे. खान हे संबंधित कंपनीचे संचालक असल्याने आता भावना गवळींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

परभणी येथील पाथरी या ठिकाणी असलेल्या कंपनीवर ईडीने (ED) कारवाई केली आहे. तर, संबंधित कंपनीचे संचालक असलेले सईद खान (Saeed Khan) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. खान हे शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आलीय.

दरम्यान, शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) यांच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवर ED ने छापेमारी केल्यानंतर,
आता परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ने मोठी कारवाई केली आहे.
तर, ज्या कंपनीच्या चौकशीसाठी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे.
त्याच कंपनीमध्ये भावना गवळी या निर्देशक म्हणजेच अध्यक्षा होत्या.
त्यामुळे आगामी काळामध्ये भावना गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये याबाबत दुसरं प्रकरण आहे त्यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केलीय.

Web Title :- ED | ed raid at shivsena mp bhavana gawali related offices in parbhani pathari arrest saeed khan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात मुस्लिम संघटनांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

Pune Crime | ग्राहकांनो गॅस मोजूनच घ्या ! घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून घेणारी टोळी गजाआड; 9 जणांना अटक 2 फरार (व्हिडीओ)

ना 12 महिन्यांचे वेटिंग ना 12 लाखांची आवश्यकता, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Mahindra Thar, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान