ED Inquiry | घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांच्या प्रकरणांची ‘ईडी’ करणार नव्याने चौकशी ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या मागे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा (ED Inquiry) ससेमिरा मागे लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यासह अनेक नेते आणि आमदारांशी संबंधित असलेल्या प्रकरणांची ईडीकडून कित्येक दिवसांपासून चौकशी (ED Inquiry) सुरू होती. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्रा आता यासर्व प्रकरणांची पुन्हा नव्याने ईडी चौकशी करणार आहे. तशी कार्यवाही देखील ईडीने सुरू केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने उभे राहिलेल्या अनेक नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती वाटू लागली आहे.

 

संजय राऊत यांच्याशी संबंधित असलेला 1 हजार 34 कोटींचा पत्रा चाळ घोटाळा खूप जुना आहे. कित्येक वर्षांपासून त्याची ईडी चौकशी (ED Inquiry) करत आहे. दरम्यान, चार महिन्यांपूर्वीच ईडीला या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्रवीण राऊत (Pravin Raut) याच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे समजले. इतकच नाही तर राऊत कुटुंबीयांच्या परदेश प्रवासाचा खर्चही प्रवीण राऊत यांच्या कंपनीने उचलला आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नीच्या 2 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली. तर प्रवीण राऊत याला अटकही (Arrest) करण्यात आली आहे.

संजय राऊतच नाही तर, आणखी काही बडे नेते आणि आमदारांशी संबंधित प्रकरणे ईडीकडे प्रलंबित आहेत. काहींवर फसवणूक आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असून त्या प्रकरणामध्ये ईडीला काही पुरावे मिळाले आहेत. एका कॅबिनेट मंत्र्यावर ईडीने 10 महिन्यांपूर्वी गुन्हा (FIR) दाखल केला होता. कथित पत्नीमुळे हे मंत्रीही चर्चेत आले होते. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. विदर्भातील अनेक नेते आणि आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एका तगड्या नेत्यावरील खटला अजूनही प्रलंबित आहे. तर अन्य एक नेता रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :-  ED Inquiry | eds watch on leaders involved in scams strict action instructions

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा