ED Investigating High Profile Cases | ED हाताळत असलेली ‘ही’ आहेत आजवरची 5 हाय प्रोफाईल प्रकरणं; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Investigating High Profile Cases | महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक (Arrest) केल्यानंतर देशभरात वातावरण चांगलच तापलं आहे. एकीकडे नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडीची कस्टडी (ED Custody) सुनावली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या अटकेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाक् युद्ध पहायला मिळत आहे. ईडीने नवाब मलिक यांची 8 तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक करण्यात आल्याने राज्यातील राजकारण पेटलं. ही घडामोड अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) असून मलिक यांचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim) याची बहिण हसिना पारकर (Hasina Parkar) सोबत असल्याचा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. जाणून घ्या ईडीने हाताळलेली 5 हायप्रोफाईल (ED Investigating High Profile Cases) प्रकरण…

 

1. ऑगस्टा वेस्टलँड VVIP हेलिकॉप्टर घोटाळा (AgustaWestland VVIP Helicopter Scam)

2007 – 08 दरम्यान काँग्रेस सरकारच्या (Congress Government) काळात अतिमहत्त्वाच्या म्हणजे VVIP लोकांसाठी काही हेलिकॉप्टर (Helicopter) घेण्याचा निर्णय झाला. यासाठी इटलीमधील Finmeccanica कंपनीची उपकंपनी असलेल्या AgustaWestland या कंपनीसोबत 12 हेलिकॉप्टरचा करार झाला होता. मात्र कालांतराने या संपूर्ण व्यवहारात 3600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले. करारादरम्यान मध्यस्थी असलेल्या Chiristian Michel आणि Rajiv Saxena यांना अटक करण्यात आली. सध्या ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. (ED Investigating High Profile Cases)

 

2. INX मीडिया प्रकरण (INX Media Case)
उद्योजक इंद्रायणी मुखर्जी (Indrayani Mukherjee) आणि तिचा पती पीटर मुखर्जी (Peter Mukherjee) यांनी स्थापन केलेल्या INX मिडियाने विदेशी गुंतवणुकीच्या कायद्याचं (Foreign Investment Act) उल्लंघन केल. या कंपनीने परदेशातून 350 कोटींची गुंतवणूक आपल्या कंपनीत आणली. 2007 सालीचा प्रकार असून 2009 मध्ये या दाम्पत्याने कंपनीतून आपला काढता पाय घेतला. P Chidambaram हे अर्थमंत्री असताना त्यांनी या गुंतवणुकीस परवानगी दिली होती. त्यानंतर यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासंदर्भातील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने 2018 मध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला.

3. स्टर्लिंग बायोटेक घोटाळा (Sterling Biotech Scam)
हा घोटाळा 2019 मध्ये उघडकीस आला. PNB Bank घोटाळ्यापेक्षाही हा घोटाळा मोठा असल्याचे ईडीने म्हटले होते. वडोदरायेथील स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड (Sterling Biotech Ltd.) आणि संदेसरा ग्रुपने (Sandesara Group) भारतीय बँकांची तब्बल 14,500 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नितीन संदेसरा (Nitin Sandesara), चेतन संदेसरा (Chetan Sandesara) आणि दीप्ती संदेसरा (Deepti Sandesara) हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असून भारतीय बँकांच्या परदेशी शाखांकडून त्यांनी खाजगी कामासाठी 9 हजार कोटी रुपये कर्ज घेतल्याचे समोर आलं. हा कथिक बँक घोटाळा करण्यासाठी कंपनीने 249 पेक्षा अधिक देशांतर्गत आणि 96 परदेशी कंपन्यांचा वापर केला. या प्रकरणात ईडीने स्टर्लिंग बायोटेक प्रवर्तकांची 9778 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

 

4. रोझ व्हॅली चिट फंड घोटाळा (Rose Valley Chit Fund Scam)
2013 च्या या घोटाळ्याने अनेकांची झोप उडवली. ईडीच्या अंदाजानुसार देशभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून 17,520 कोटी रुपये उभारण्यात आले होते. हा संपूर्ण घोटाळा अंमलात आणण्यासाठी तब्बल 27 कंपन्यांचा वापर केला असून त्यातील अधिक कंपन्या या बोगस होत्या. रोझ व्हॅली ग्रुपचे अध्यक्ष गौतम कूंडू (Gautam Kundu) यांना 2015 मध्ये अटक करण्यात आली असून ईडी त्यांच्याकडे तपास करत आहे.

5. कोळसा खाण वाटप घोटाळा (Coalgate)
Coal Block Allocation Scam म्हणजे, देशातील सगळ्या मोठ्या घोटाळ्यापैकी एक.
उत्खननासाठी दिल्या जाणाऱ्या कोळशाच्या खाणींसदर्भातील हा घोटाळा आहे.
अनेक खाजगी आणि सरकारी कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. 2004 – 2009 या कालावधीत अकार्यक्षम पद्धतीने 194 कोळसा खाणींचे वाटप झाल्याचे CAG च्या अहवालात उघडीस आले.
यामुळे देशाला 1.86 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्या ईडी या प्रकरणाची चौकशी करत असून Ramsarup Lohh Udyog Ltd आणि EMTA Coal Ltd या कंपन्याची मालमत्ता जप्त केल्या आहेत.

 

Web Title :- ED Investigating High Profile Cases | ed investigating high profile cases in india enforcement directorate maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा