तबलिगी जमात प्रकरणी ED कडून छापेमारी सुरू !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये मुंबईसह इतर काही भागांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईतील अंधेरीसह चार ठिकाणीछापे टाकण्यात आले.

पैशाच्या अफरातफर प्रकरणी ईडीने तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याविरोधात 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाईला वेग आला असून मुंबतही छापेमारी करण्यात येत आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन करणार्‍या आणि कोरोनाचा फैलाव करणार्‍या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर मौलाना साद फरार झाले होते.