सावंतांची ‘ब्रेकिंग न्यूज’ ! ‘सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रेकिंग न्यूज… ‘सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा’ असं काहीसं ट्विट केलंय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी. हे ट्विट करून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळेच राज्यात सत्तास्थापनेला उशीर होत असल्यानं विरोधकांकडून टीका होत आहे. ट्विटव्दारे काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी भाजपावर जहरी टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीपुर्वी ईडीनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आणि राजकीय वातावरण चांगलच तापलं. त्यावेळी सत्ताधारी भाजपा ईडी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोप देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला. त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील ईडीकडून चौकशी सुरू झाली.

त्यानंतर तर राष्ट्रवादीनं ईडीवरून भाजपा सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीत भाजपाला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही आणि त्यामुळेच पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे. निवडणुकीपुर्वी ज्या पध्दतीने भाजपाने ईडीची मदत घेतली त्याचप्रमाणे सत्तास्थापनेसाठी देखील भाजपा ईडीची मदत घेणार असल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

 

Visit : Policenama.com