‘महाविकास’ सरकारमधील आणखी एका नेत्याच्या पत्नीला ED ची नोटीस ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे राज्याचे सहकार राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीकडून नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. स्वप्नाली कदम ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या
सूनबाई आहेत. आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या त्या कन्या आहेत.

२७ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तर २०१९ मध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे व मुंबईतील ठिकाणांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वप्नाली कदम यांच्या चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावली असल्याची माहिती समोर येत आहे.

याआधी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर आता राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली असल्याचे पुढे आले आहे.