ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ED कडून समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधव (Shivaena Leader Yashwant Jadhav) यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) समन्स बजावण्यात आला आहे. गेल्या काही दिवसाआधी यशवंत जाधव यांच्या घर, मालमत्तावर आयकर विभागाकडून (Income Tax Department) छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. (ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav)

ईडीकडून फेमा कायदा अंतर्गत (FEMA Act) जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आलेय. आयकर विभागाने यशवंत जाधव (ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav) यांची जी चौकशी केलीय, तसेच, कंपनी व्यवहार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने त्यांच्या बेनामी कंपनीची चौकशी केली असता, काही मोठी रक्कम त्यांच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. ही कशी केली होती याची चौकशी ईडी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

जानेवारी महिन्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर खात्याने जाधव यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त केल्या होत्या. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला होता.

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनूसार, यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 झाली आहे. यामध्ये कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी, या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मागील काही दिवसांत आयकर खात्याने या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली. यामध्ये काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला आहे. काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केले. ही संपूर्ण रक्कम रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

यामध्ये एक मध्यस्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली होती. यासाठी रोखीने पैसे स्वीकारल्याची त्या ज्वेलर्सने कबुली दिलीय. बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही समोर आलेय, त्याचबरोबर कोरोनेशन बिल्डिंग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डिंगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी तीन कोटींहून जादा रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे.

Web Title : ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav |
enforcement directorat -(ED) issues summons to shiv sena leader yashwant jadhav

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त