SSR Death Case : प्रकरणाचा तपास CBI कडे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सीबीआयची टीम मुंबईला जाण्यास ‘रेडी’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप केला आहे की, तिची सुशांतच्या पैशांवर नजर होती आणि त्याच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केले आहेत. ईडीने रियासह अनेक लोकांचीही चौकशी केली आहे. परंतु या प्रकरणात चौकशी झालेल्या मुख्य संशयितांच्या निवेदनावर ईडीचे समाधान नाही.

या प्रकरणात रिया चक्रवर्तीची दोनदा चौकशी केली गेली आहे. तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची तीनदा चौकशी करण्यात आली आहे. ईडीने श्रुती मोदीची तीनदा आणि सिद्धार्थ पिठानीची दोनदा चौकशी केली आहे. या व्यतिरिक्त आणखी १३ साक्षीदार आहेत, ज्यांची निवेदने ईडीने आतापर्यंत नोंदवली आहेत.

ईडीनुसार, मुंबई पोलिसांनी अद्याप डिजिटल पुरावे म्हणजे सुशांतचा मोबाइल फोन आणि लॅपटॉप यासारखे पुरावे शेअर केले नाहीत. याशिवाय फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टदेखील शेअर करणे बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडी या प्रकरणातील मुख्य संशयितांना पुन्हा समन्स पाठवेल. सुशांतच्या वडिलांचे निवेदन या प्रकरणात प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाईल.

दुसरीकडे सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयची एसआयटी टीम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईला रवाना होईल. सध्या सीबीआयची टीम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.