ताज्या बातम्यामुंबईराजकीय

ED Notice to Anil Parab | अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस, संजय राऊत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ED Notice to Anil Parab | केंद्री मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भडकलेल्या राणे यांनी पलटवार करण्याचा गर्भीत इशारा दिला होता. आता राणेंची जनआशीवार्द यात्रा संपताच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची (ED Notice to Anil Parab) नोटीस आली आहे. यावर शिवसेनेकडून, अपेक्षेप्रमाणे परब यांना ईडीची नोटीस आली, अशी प्रतिक्रिया आली आहे.

मंत्री अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीची माहिती देण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले असून यामध्ये म्हटले आहे की, ’शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले आहे. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता, असे म्हणत राऊत यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक झाली त्याच दिवशी शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब, आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अनिल परब यांनी पोलिसांना फोन केला होता. हे सर्व बोलणे माईकमध्ये रेकॉर्ड झाले. याचा व्हिडिओ वायरल झाला होता.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

परब यांना एका पोलिसांचा फोन आला होता.
यावेळी परब यांनी पोलिसांनी राणे ज्या ठिकाणी होते तेथील माहिती जाणून घेतली. त्यानंतर पुढे डीजींना बोलतो म्हणून सांगितले.
यावेळी भास्कर जाधव यांनी सत्र न्यायालयाने राणेंना जामीन नाकारल्याची माहिती दिल्याने परब यांनी पुन्हा फोन लावला.

तुम्ही लोक काय करताय, पण तुम्हाला ते करावेच लागणार आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेता की नाही?
ते ऑर्डर कसली मागत आहेत? कोर्टानेच आता नाकारले आहे, हायकोर्टातही येणार नाही.
त्यांना घ्या ना, पोलीस फोर्स वापरून करा, कोर्टबाजी चालूच आहे, वेळ लागणार आहे,
असे परब यांनी पलिकडील व्यक्तीला सांगितल्याचे व्हिडिओमध्ये दिसले होते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राणे यांनी गर्भीत इशारा देत योग्य वेळी हिशेब करणार, असे म्हटले होते.
आता अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे.
यामुळे भाजपा-शिवसेनेतील तणाव आणखी वाढणार असे दिसत आहे.

Web Title : ED Notice to Anil Parab | as expected ed notice to anil parab sanjay raut gave shabbaski to the central government

 

Back to top button