ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती

मुंबई : ED Notice To NCP Leader Jayant Patil | सत्ता संघर्षातील निकाल आज येणार असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस पाठविली आहे. त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटीशीतून देण्यात आले आहेत.

काय आहे आय एल अँड एफ एस प्रकरण (IL And FS Case)

मुंबईतील कापड मिलच्या (Mumbai Textile Mills) जमीन विक्रीप्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोपावरुन सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने (Delhi Police EoW) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे सोपविण्यात आले होते.

आय एल अ‍ँड एफ एस प्रकरणात यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना २०१९ मध्ये
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस पाठविण्यात आली होती.
आय एल अँड एफ एस म्हणजे कोहीनूर मिलची (Kohinoor Mill) जमीन विक्री प्रकरण होय.
कोहिनूर प्रकरणात राज ठाकरे यांना मामुली किंमतीत शेअर देण्यात आले होते.
त्यानंतर त्यांनी या कंपनीतील आपले शेअर विकून ते बाहेर पडले होते.
या प्रकरणात तब्बल २२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी सभा घेऊन लाव रे तो व्हिडिओ द्वारे भाजप व सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता.
त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठविली होती.
या नोटीसीनंतर राज ठाकरे यांनी भाजप सरकारविरोधातील (BJP Govt) विशेषत: केंद्र सरकारवरील टिका बंद केली होती.
विधानसभेत त्यांनी भाजपविरोधातील टिका जवळपास थांबविली होती.
त्याचा मोठा फटका मनसेच्या राज्यभरातील उमेदवारांना बसला होता.
त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. आता ई डीने चार वर्षानंतर पुन्हा एकदा या फाईलवरुन धुळ झटकली आहे.
(ED Notice To NCP Leader Jayant Patil)

Web Title :-  ED Notice To NCP Leader Jayant Patil | ED notice to NCP state president Jayant Patil; It was also sent to Raj Thackeray 4 years ago

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandni Chowk Flyover Pune | चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे; खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र

Narhari Zirwal | 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस नाही तर…, नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले