ED Raid | दिवसभर ईडीचा धडाका ! शिवसेना खासदार गवळी, अनिल परब यांच्यानंतर आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मागे ED

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ED Raid । राज्यात सक्तवसुली संचालनालयाने धाडिसत्र सुरुच केलं आहे. आज तर सकाळपासूनच दिवसभर सक्तवसुली संचालनालयाने छापेमारीचा धडाका सुरु केला आहे. शिवसेना नेत्या आणि यवतमाळच्या खासदार भावना गवळी (MP Bhawana Gawali) यांच्या 5 ठिकाणी असलेल्या संस्थांवर ईडीने धाड टाकली आहे. यानंतर लगेच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या 3 ठिकाणच्या मालमत्तेवर छापेमारी केली. यांनतर आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मागे देखील ED Raid चा ससेमिरा लागल्याचे समोर आले आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसवरही (Actress Jacqueline Fernandez) सक्तवसुली संचालनालयाचा (ED) फेरा आला आहे. गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या मनी लॉडरिंग प्रकरणातच (Money laundering case) जॅकलिन फर्नांडीसची चौकशी करत आहे. या दरम्यान, यापूर्वी काही सेलेब्रेटिजची नाव समोर आली आहेत. यात यामी गौतमचीचं देखील नाव असून तिची देखील अशाच प्रकारे काही महिन्यां अगोदर चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, मनी लॉडरिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडीसची (Actress Jacqueline Fernandez) चौकशी सुरु आहे.

Web Title : ED Raid | acteress jacqueline fernandez questioned about money laundering case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update