ED Raid | पिंपरी-चिंचवडमध्ये ईडीची छापेमारी, जाणून घ्या प्रकरण?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमधील दि सेवा विकास बँकेचे (The Service Development Bank) माजी अध्यक्ष, संचालक अमर मुलचंदाणी (Amar Mulchandani) यांच्यासह तीन संचालकांवर (Directors) सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीने (ED Raid) शुक्रवारी (दि.27) छापे टाकले. बेहिशोबी करोडो रुपयांचे कर्ज वाटप (Loan Allocation) केल्याप्रकरणी ईडीने छापेमारी केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात ईडीकडून (ED Raid) कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

दि सेवा विकास सहकारी बँकेत संगनमताने बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आरबीआयने (RBI) कारवाई केली आहे. तसेच या बँकेचा दोन महिन्यांपूर्वी परवाना रद्द केला आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली होती.

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते.
याप्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले.
ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले.
कर्ज देताना परतपेडीची क्षमता व अन्य निकष तापसले नाही. यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले.
सहकार सह आयुक्त राजेश जाधवर (Joint Commissioner of Co-operation Rajesh Jadwar) यांनी 2020 मध्ये कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हा घोटाळा समोर आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) गुन्हा (FIR) दाखल करुन अमर मूलचंदाणी यांच्यासह पाच जणांना अटक (Arrest) केली होती.

शुक्रवारी सकाळी ईडीचे (ED Raid) पथक पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले.
पिंपरीतील गणेश हॉटेल, तपोवन मंदिराजवळ मिस्ट्री पॅलेज या इमारतीत अमर मूलचंदानी यांचे निवासस्थान आहे.
याच ठिकाणी ईडीचे अधिकारी आज सकाळपासून ठाण मांडून आहेत. कसून तपासणी सुरु आहे.
इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात आहेत. कोणालाही या इमारतीत प्रवेश दिला जात नाही.
याशिवाय मुलचंदानी यांचे जयहिंद महाविद्यालयासमोरील कार्य़ालय आहे.
येथेही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सायंकाळी चारपर्यंत माजी संचालकांच्या घर आणि कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.
याशिवाय इतर संचालकांच्या निवासस्थानीही पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Web Title :- ED Raid | ed raids on former director of seva vikas bank in pimpri pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात