ED Raid On Anil Parab | शिवसेनेला आणखी एक धक्का ! अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या निवासस्थानी ED ची धाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Raid On Anil Parab | शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या संबंधित मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाकडून Directorate of Enforcement (ED) छापेमारी करण्यात आली आहे. परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणावर छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरीही ईडीने धाड टाकली आहे.

 

संजय कदम यांच्या घरी सकाळपासून ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी शिवसैनिकांची जमा व्हायला सुरूवात झाल्याची माहिती आहे. या दरम्यान यापुर्वीही अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी पथकाला संजय कदम यांच्या निवासस्थानी मोठा मुद्देमाल हाती लागला होता. त्यानंतर आता 2 महिन्यांनी ईडीने छापेमारी केली आहे. (ED Raid On Anil Parab)

 

अनिल परबांशी संबंधित 7 ठिकाणावर छापा –
शिवसेना नेते अनिल परब यांच्या मुंबई येथील घरावर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने छापा टाकला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरी येथे देखील ईडीची कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण करत अनिल परब यांना तुरुंगात जावे लागणार असं भाकित केलं आहे.

 

Web Title :- ED Raid On Anil Parab | shivsena leader sanjay kadam ed raid with maharashtra minister anil parab

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा